दिव्यांग नवदाम्पत्याला पेढे भरवून दिला आशीर्वाद

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दिव्यांग मंडळांमध्ये विविध कामकाजासाठी येत असलेल्या दिव्यांग सामाजिक कार्यकर्तीचा नुकताच विवाह झाला. बुधवारी ६ एप्रिल रोजी त्या रुग्णालयात आल्या असता दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे यांनी तिला पेढे भरवून भरभरून आशीर्वाद दिले. नवदांपत्य दोन्ही दिव्यांग आहेत.

येथील प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पाचोरा तालुका अध्यक्ष असलेल्या सरला बाबूलाल गढरी या दिव्यांग बांधवांसाठी काम करतात. दिव्यांग मंडळाचे अध्यक्षांसह कर्मचाऱ्यांशी संवाद साधून दिव्यांग बांधवांच्या प्रमाणपत्र अडचणींविषयी चर्चा करीत असतात.

नुकतेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने सरला गढरी यांचे दिव्यांग असलेल्या भूषण खैरनार यांच्याशी नुकताच विवाह झाला. बुधवारी ६ एप्रिल रोजी त्या रुग्णालयात कामकाजनिमित्त आले असता दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांनी सामाजिक सलोखा जपत नवदाम्पत्य सरला व भूषण यांना पेढे भरवून भरभरून आशीर्वाद दिले.

यावेळी सरला गढरी यांची आई इंदिराबाई गढरी, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष हरिष कुमावत, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी उपस्थित होते

Protected Content