रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना रावेर-पाल दरम्यान घडली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर- पाल दरम्यान असलेल्या गारखेडा घाटात दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक दिल्याने यातील एक जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. रावेरहून पालमार्गे मध्यप्रदेशात दुचाकी जात होती. त्यावेळी पालकडून रावेरच्या दिशेने समोरून येणारी दुचाकीची गारखेडा जवळ समोरासमोर धडक दिली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रूग्णवाहिका आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयताचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेला रावेर पोलीसांनी दुजोरा दिला आहे.