मनपा कर्मचाऱ्याला हॉकर्स धारकांकडून मारहाण, धक्काबुक्की; दोन जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । हॉकर्सने लावलेली विक्रीची गाडी दुसरीकडे घेवून जात असे सांगितल्याने त्याचे वाईट वाटून हॉकर्सने महापालिकेचे कर्मचाऱ्याला दोन हॉकर्सधारकांकडून मारहाण व धक्काबुक्की केल्याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील प्रितम चहाजवळ शिवाजी रोडवर शेख नदीम या विक्रेत्याने त्याचे कांदे व बटाटे असलेली गाडी लावली होती. यादरम्यान महापालिकेचे कर्मचारी हरीश सोमा सोनवणे (वय-४९) रा. तानाजी मालुसरे नगर हे कर्मचार्‍यांसह अतिक्रमण कारवाईसाठी गेलेले होते. सोनवणे यांनी विक्रेता शेख नदीम शेख ऐजाज (वय-३०) यास लोटगाडी दुसरीकडे घेवून जात असे सांगितले. त्यावरुन शेख नदीम याने सोनवणे यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच ‘तुम मु देख कर काम करते हो’ असे म्हणत शिवीगाळ तसेच दमदाटी केली. यानंतर सोनवणे यांनी तक्रारीसाठी शहर पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन शेख नदीम शेख ऐजाज याच्यासह इम्रान शेख एजाज (वय-३२) या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश बुवा हे करीत आहे

Protected Content