वराड बु : येथे रेशन धान्य दुकानदार दाम्पत्यास मारहाण ; पोलिसात तक्रार (व्हीडीओ)

धरणगाव प्रतिनिधी । नियमबाह्यरित्या जास्तीचे धान्य द्यावे, म्हणून तालुक्यातील वराड बु : येथील रेशन धान्य दुकानदार दाम्पत्यास मारहाण, शिवीगाळ तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गावातील चार जणांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांनी एकत्र येत आंदोलानाचा इशारा दिला आहे.

 

या संदर्भात धरणगाव पोलिसात दिलेल्या अर्जात दुकानदाराने म्हटले आहे की, आज नेहमी प्रमाणे वराड बु : येथे रेशन दुकानावर धान्य वाटप करत असताना टिकाराम रामचंद्र पाटील, देवीदास बळीराम पाटील, सागर देविदास पाटील, रवींद्र पाटील (सर्व. रा.वराड बु ) यांनी दुकानावर येत आम्हाला जास्तीचे रेशन पाहिजे म्हणून दादागिरी करू लागले. परंतू शासकीय शासकीय आदेशाप्रमाणे युनिट प्रमाणेच रेशन देता येईल, असे सांगितले. परंतू हे लोकं अंगावर धावून आले. यावेळी माझी पत्नी मध्ये आली असता, तिला मारहाण व शिवीगाळ करून विनयभंग करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसात तक्रार दिल्यानंतर तालुक्यातील रेशन धान्य दुकानदार तहसील कार्यालयात गेले होते. याठिकाणी त्यांनी पुरवठा अधिकारींची भेट घेत सुरक्षतेची मागणी केली. दरम्यान, यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुका अध्यक्ष आर.डी.पाटील यांनी रेशन दुकानदारांवर असेच हल्ले होत राहिल्यास आंदोलन केले जाईल. तसेच काही लोकं आणि पुढारी रेशन दुकानदारांना धान्य घेण्यासाठी खोट्या तक्रारी करण्याचे सांगून ब्लॅकमेल करत, असल्याचा आरोपदेखील रेशन दुकानदार संघटनेने केला आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/520360368639204/

 

Protected Content