कारण नसतांना दोन मित्रांना बेदम मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील मनुश्री हॉस्पीटल येथे कारण नसतांना दोन जणांना चौघांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, निलेश दिलीप भोई रा. रूपजी नगर, अमळनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास निलेश भोई हा त्याचा मित्र उमेश कोळी यांच्या सोबत शहरातील मनुश्री हॉस्पिटल येथे उभे होते. त्यावेळी काहीही कारण नसतांना गावात राहणारे कामील खाटीक, दानिश आणि कयुम या तीन जणांनी निलेश भोई याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. यावेळी सोबत असलेला मित्र उमेश कोळी हा आवरण्यासाठी आले असता त्याला देखील मारहाण केली. यात निलेश हा जखमी झाला असून त्याला अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी निलेश भोई याने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी ८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.

Protected Content