चाळीसगाव ग्रामीण भागात विना मास्क धारकांवर पोलिसांची कारवाई

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तालुक्यातील ग्रामीण भागात विना मास्क धारकांवर पोलिसांकडून धडाकेबाज कारवाई करण्यात येत आहे. यात ६३ जणांवर कारवाई करण्यात आली असून यांच्याकडून ६ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात अक्षरशः थैमान घातले आहे. त्यात ग्रामीण भागात रूग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. हि रूग्णं संख्या आटोक्यात आणण्यासाठी ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या निर्देशानुसार एकूण चार पथके निवडण्यात आले आहे. या पथकाने बुधवार, १९ रोजी तालुक्यातील हिंगोणे, करगाव, रांजणगाव, बोरखेडा खु. आदी ठिकाणी विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी प्रत्येकी १०० प्रमाणे एकूण ६३ जणांवर कारवाई करण्यात आली. यातून ६,३०० दंड वसूल करण्यात आले.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवा युवराज नाईक, शशीकांत महाजन , शांताराम पवार, भुपेश वंजारी, प्रेमसिग राठोड, कैलास पाटील, गोकुळ सोनवणे, जयवंत सपकाळे, अमोल चौधरी व नगरसेना आदींनी हि कारवाई केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे तालुक्यात ग्रामीण पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच कारवाई दरम्यान विनाकारण घराबाहेर पडू नये, नेहमीत तोंडावर मास्क लावणे, हाताला सॅनिटाझ करणे कोरोनाविषयक जनजागृती हि पोलिसांकडून केली जात आहे. सध्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लग्न समारंभात २५ जणांच्या उपस्थितीत लग्न लावण्याचे आदेश शासनाने दिले आहे. तरीही ग्रामीण भागातील काही ठिकाणी मोठ्या संख्येने लग्न समारंभात गर्दी केली जात आहे. त्यामुळे लग्न समारंभात २५ पेक्षा जास्त जणं आढळून आल्यास व नियमांची पायमल्ली केल्यास गुन्हा दाखल केला जाईल असे सुतोवाच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले.

Protected Content