थोरगव्हाण येथे खळवाडीत भीषण आग; दोन बैलांचा होरपळून मृत्यू, लाखोंचे नुकसान

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण येथील खळवाडीला अचानक लागलेल्या आगीत दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर शेतीचे अवजारे, चारा व बैलगाडी जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील थोरगव्हाण येथील शेतकरी जानकीराम नामदेव पाटील यांच्या खळ्याला आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर शेतीची अवजारे, बैलजोडी जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आग लागल्याचे वृत्त कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठ्या प्रमाणावर असल्याने यावल नगरपरिषदेचा अग्नीशमन बंब बोलाविण्यात आली होती. बंब येईपर्यंत चाऱ्याने भरलेले शेड, बैलगाडीसह सर्व जळून खाक झाले होते. पोलीस पाटील गजानन चौधरी यांनी पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्याशी संपर्क साधून बंब बोलाविण्यात आला होता. एक तासानंतर लागलेली आग विझविण्यात आले. तलाठी एस.एस.तायडे यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. गावकऱ्यांनी समय सूचकता बाळगून केलेल्या सहकार्यमुळे सुदैवाने फार मोठी जीवितहानी टळली.

Protected Content