कोरोना विरोधातील युद्धात सहभागी माजी सैनिकांना होमिओपॅथी टॅबलेटचे वाटप

पाचोरा, प्रतिनिधी । शहरातील पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असलेले सेवानिवृत्त फौजी यांना कॉग्रेस आरोग्य दुत आणि सत्यम होमीओपॅथीक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने टॅबलेटचे वाटप पंधरा दिवसापासुन करण्यात येत आहे.

देशाची सेवा बजावलेले सेवानिवृत्त सैनिक कोरोना लढाईत आपल्या गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून शहरातील विविध भागात गस्त घालत आहेत. कोरोनाग्रस्त असो की नसो कोणत्याही भागात जवळपास ७० हुन अधिक फौजी बांधव रस्त्यावर गस्त घालतांना दिसत आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून शहरातील आरोग्यदुत कॉग्रेस आरोग्य सेवा सेल प्रदेश सरचिटणीस सचिन सोमवंशी यांनी घेऊन जवळपास पंधरा दिवसांत डॉ. रोहीत बोथरा यांच्या सत्यम होमीओपॅथीक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करणार्‍या होमीओपॅथी टॅबलेट मोफत वाटप करण्यात येत आहेत. यावेळी सेवा निवृत्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांच्या सह सर्वच सैनिक हजर होते. यावेळी कोरोनाविषयी काय काळजी घ्यायची यावर होमीओपॅथी तज्ञ डॉ. प्रशांत सांगळे, डॉ. रोहीत बोथरा, सचिन सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले.

Protected Content