Home राष्ट्रीय अम्फान वादळामुळे पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात वादळासह मुसळधार पाऊस

अम्फान वादळामुळे पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात वादळासह मुसळधार पाऊस

0
49
0Rain 1
0Rain 1


मुंबई (वृत्तसंस्था) अम्फान वादळामुळे पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात जोरदार वादळासह मुसळधार पाऊस सुरु आहे.

 

यापूर्वी बांकुरा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच पश्चिम मिदनापूरला लागूनच असलेल्या सारेंगा ब्लॉक क्षेत्रातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोलकाता विमानतळाला वादळापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. वादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन विमानतळाच्या तीन सी प्रवेशद्वार वगळता इतर सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आली आहेत. वादळाचा परिणाम आसनसोलमध्येही दिसून आला. सकाळपासूनच आकाश ढगाळ असून अधूनमधून पाऊस पडत आहे. आसनसोलच्या कुल्ती भागात पावसाने वादळासह तडाखा दिला.


Protected Content

Play sound