भवरलाल अॅॅन्ड कातांबाई जैन फाउंडेशनतर्फे तमाशा कलावंताना किराणा वाटप

जळगाव,प्रतिनिधी । कोरोना काळात लोककलावंतांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपल्याने अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष अॅॅड. रोहीणीताई खडसे यांनी या कलावंतांना मदतीचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत जैन उद्योग समुहाचे प्रमुख अशोकभाऊ जैन यांनी किराणा किट दिले.  या किटचे वितरण  खान्देश तमाशा व शाहीर लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या हस्ते पारोळा येथे करण्यात आले.

कोरोनाच्या   या महामारीत सर्व घटकावंर मोठा परिणाम झाला आहे. यात  कलेवर पोट असणारा लोककलावंत ही या  महामारीत होरपळून निघाला आहे. या वर्षभराच्या काळात अनेक संकटाचा सामना करीत कोरोनाने उध्वस्त होत चाललेल्या जिल्ह्यातील लोककलावंता स्थिती अत्यंत हलाखीची होत चालली आहे.  लोकरजंनाचे, लोकप्रबोधनाचे अविरतपणे कार्य करणा-या लोककलावंताकडे शासना सोबतच  मायबाप रसिकांनी देखील पाट फिरवल्यामुळे लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.  जिल्हयात सध्य स्थितीत तमाशा मंडळ,  शाहीरी पथके, वहीगायन कलापथक, वाघ्या मुरळी, गोंधळी , वासुदेव, सोंंगाड्या पार्टी, आदी कलाक्षेत्रात कार्यरत  लोककलावंत या कोरोना महामारीचा सामना करीत करीत आहे.  या परिस्थितीत लोकलावंताना मदत करण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष अॅॅड. रोहीणीताई खडसे यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जैन उद्योग समुहाचे प्रमुख अशोकभाऊ जैन यानी भवरलाल अॅॅन्ड  कातांबाई जैन फाउंडेशनमाध्यमातून  २०  किराणा  किट  खान्देश तमाशा व शाहीर लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या कडे सुपूर्त केले होते.  आज परोळा येथे २०  तमाशा तमाशा कलावंताना हया किराणा  किटचे वाटप करण्यात आले.  अखिल भारतीय नाट्य परिषद व खान्देश तमाशा व शाहीर लोककलावंत विकास परिषदेच्यावतीने सुरू असलेल्या या लोककलावंत मदत अभियानात लोककलावंताच्या घरोघरी जाऊन ही मदत करण्यात येत आहे. अशोकभाऊ जैन यांनी मदत केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आज २०  तमाशा कलावंताना करण्यात आले.  या प्रसंगी खान्देश तमाशा परिषदेचे अध्यक्ष शेषराव नाना गोपाळ, नाट्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य संदिप घोरपडे व लोककलावंत मदत अभियानाचे मुख्य समन्वयक विनोद ढगे आदि मान्यवर उपस्थित होते.

Protected Content