स्वच्छते संदर्भातील तक्रारी वाढल्यास संबंधित प्रभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई – जितेंद्र मराठे

जळगाव प्रतिनिधी  | शहरात स्वच्छेतसंदर्भात तक्रारी वाढल्यास संबंधित प्रभागातील अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी दिला.

शहरात आरोग्य विभाग संदर्भातील वाढत्या तक्रारी पाहता आज आरोग्य कर्मचारी, सुपरवायझर, मक्तेदार यांच्या बैठकीचे आयोजन आरोग्य समिती सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

शहरात आरोग्य संदर्भातील नागरिकांकडून तक्रारीत वाढ झाली आहे यात घंटागाड्या नियमित येत नसून दररोज स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. आपल्या कामात सुधारणा करावी, कमी मनुष्यबळाच्या तक्रारी ऐकून घेतल्या जाणार नाही. आहेत त्याच कामगारांकडून शहरातील नियमित स्वच्छता करण्यात यावी अशा सूचना आरोग्य समितीचे सभापती जितेंद्र मराठे यांनी संबंधितांना दिल्या.

मनपाच्या विशेष समिती सदस्यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य समितीच्या माध्यमातून तातडीने कामाला सुरूवात करण्यासाठी सभापती जितेंद्र मराठे यांनी आरोग्य विभागाचा आज 8 मार्च रोजी आढावा घेतला. मंचावर सहा.आयुक्त पवन पाटील उपस्थित होत.

मनपाच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात दुपारी 4 वाजता झालेल्या बैठकीत आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांसह वॉटर ग्रेस कंपनीच्या प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक प्रभागातील आरोग्य अधिकार्‍यांकडून दैनंदिन साफसफाईची माहिती घेण्यात आली. तसेच कुणाच्याही दबावाखाली काम करू नये. स्वच्छेतसंदर्भात तक्रारी वाढल्यास संबंधित प्रभागातील अधिकार्‍यांंवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सभापती जितेंद्र मराठे यांनी दिला.

Protected Content