श्री दत्त हायस्कूल येथे “जागतिक महिला दिन साजरा”

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चिखली बु॥ येथील श्री. दत्त हायस्कूलमध्ये आज जागतिक महिला दिन सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. 

विद्यालयाचे मुख्याध्यापक के. यु. पाटील यांनी राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, वीरश्री लक्ष्मीबाई राणी, माता रमाबाई यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. तसेच याप्रसंगी समाज प्रबोधनाचे विविध क्षेत्रात राहुन आपल्या त्यागातुन समर्पणाचा असीम कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचे स्मरण करण्यात आले. तसेच दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान म्हणून विद्यालयातील महिला  शिक्षिकांचा मुख्याध्यापक यांचे हस्ते शिक्षीका प्रतिभा नारखेडे, पुष्पा चौधरी, मिनाक्षी चौधरी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी एन. एस. बडगुजर, के.व्ही.झाबरे लोहार, डी. पी. नेवे, एम. व्ही. ठाकुर या प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी महिलांच्या कार्यकतृत्वाची माहेती वर्णन करतांना मुख्याध्यापक के. यु. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content