जेसीआयच्या कार्यशाळेत ध्येय निश्‍चितीवर मार्गदर्शन

jci jalgaon workshop

जळगाव प्रतिनिधी । जेसीआय जळगावतर्फे धनाजी नाना महाविद्यालयात सुरू असणार्‍या कार्यशाळेत गोल सेटींग अर्थात ध्येय निश्‍चितीवर मार्गदर्शन करण्यात आले.

जेसीआय जळगावतर्फे शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात पाच दिवसीय युथ एंपॉवरींग कार्यशाळा सुरू आहे. यातील दुसर्‍या दिवशी गोल सेटींग म्हणजेच ध्येय निश्‍चितीवर मार्गदर्शन करण्यात आले. याच्या ंतर्गत ट्रेनर डॉ. सूर्यकिरण वाघण्णा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी फ्यूचर प्लानिंग ,रियलिटी वर्क व विज़न यांच्याबाबत उहापोह करून प्रत्येकाने ध्येय निश्‍चित करण्याचे सांगितले.

यावेळी जेसी जळगाव अध्यक्ष प्रतीक शेठ, वरुण जैन, आबासाहेब पाटिल, प्रकल्प प्रमुख भाग्येश त्रिपाठी, प्रियंका बर्‍हाटे आदींची उपस्थिती होती.

Protected Content