भावी पिढीसाठी चांगली चळवळ निर्माण करावी लागेल- इंद्रजित देशमुख

indrajit deshmukh chopda

चोपडा प्रतिनिधी । भावी पिढीसाठी चांगली चळवळ निर्माण करावी लागेल. जग हे सुंदर व्हावे हीच अपेक्षा असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जि.प.चे कार्यकारी अधिकारी तथा कवि इंद्रजित देशमुख यांनी केले. ते मनवभारताच्या निर्मितीसाठी युवकांचे योगदान या विषयावर व्याख्यान देतांना बोलत होते.

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांचे उदघाटन सोहळ्यास कला, शास्त्र, आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणावर प्रारंभ करण्यात आला अध्यक्षस्थानी उमविचे पहिले कुलगुरु डॅा.एन.के.ठाकरे होते. सुवर्ण महोत्सवाला संस्थेचे संस्थापक माजी आ.डॅा.सुरेश पाटील यांच्या व मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविक महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांनी संस्थेच्या ५० वर्षांचा आढावा घेतला.संस्थेत दहा हजार विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत.बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणाची तसेच तंत्रशिक्षणाची दालने या संस्थेत आहेत. परिचय प्रा.माया शिंदे यांनी करुन दिला.कार्यक्रमाचे अध्यक्ष उमविचे माजी कलगुरु डॅा.एन.के.ठाकरे होते.मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील व कार्यकारणी सदस्य प्रा.डी.बी.देशमुख,प्राचार्य डी.ए.सुर्यवंशी यांनी केले. यावेळी मंचावर माजी जि.प.अध्यक्ष गोरखतात्या पाटील, माजी आ.कैलास पाटील, माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, जि.प.सभापती दिलीप पाटील, माजी प्राचार्य डॅा. पी.बी.पाटील, डॅा.डी.डी.पाटील, नगराध्यक्ष मनीषा चौधरी,माजी उपाध्यक्ष अ‍ॅड.व्ही.डी.जोशी,प्रा.डॅा.अमोल बोरसे,माजी उपप्राचार्य जे.डी.पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी कवि इंद्रजीत देशमुख म्हणाले की, बुध्दी माणसाला दुर लोटते पण हृदय माणसाला जवळ करते.शिक्षण संस्था स्थापन करणे सोपे चालविणे कठीण आहे.नवनिर्मितीत घडत कोण आहे? मला काय व्हायचंय? भोगवादी वस्तुंचा आस्वाद न घेता आलं पाहिजे.त्यामुळे माझ्यातला मस्वफ समजला पाहिजे.नाही ते होण्याचा प्रयत्न केला तर ते जमतच नाही.निर्णय घेण्याच्या टप्प्यावर दोन वाटा येतात त्यातील कोणती स्विकारायची हे कळलं पाहिजे.भविष्य अंधारमय हव की उज्जवल हे युवकांनी ठरविले पाहिजे.युवकांनो आपले भविष्य ठरवितांना बाळ कुपोषीत असता कामा नये,त्याला उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे.त्याला जात पात न दाखविता सगळ मिळाले पाहिजे. त्यासाठी हृदय असणारी माणसे जन्मली पाहिजे.माणूस नावाच्या पिढीने सुंदर जग तयार करायची हे स्वप्न असले पाहिजे.

याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना माजी कुलगुरू डॅा.एन.के ठाकरे म्हणाले की, उच्चशिक्षण टाकाऊ आहे,त्यासाठी काम करणार्‍या संस्था योग्य नाहीत,असे देशात बोलले जाते त्यामुळे त्यावर चर्चा करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्ष आशा पाटील, सचिव डॅा.स्मिता पाटील, कार्यकारणी सदस्य प्रा.डी.बी.देशमुख, सुरेश सी.पाटील, दिलिपराव पाटील, सिमा जैन, आदि उपस्थित होते.

Protected Content