चोरीच्या तीन मोटारसायकलींसह संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून चोरीच्या मोटारसायकल घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपीला चोपडा शहरातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या असून पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चोपडा शहरात मोटारसायकली चोरीचे प्रमाण अधिक वाढले होते. या अनुषंगाने पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसननजन पाटील यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ संदीप पाटील, अश्रफ शेख, दिपक पाटील. पो.ना. प्रविण मांडोळे, पो.कॉ. परेश महाजन, हेमंत पाटील, प्रमोद ठाकूर यांनी सोमवारी ३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता कारवाई करत संशयित आरोपी दिपक सुमऱ्या बारेला (वय-२७) रा. कर्जाणा ता. चोपडा याला चोपडा शहरातील कारगील चौकातून सापळा रचुन अटक केली. त्यांची चौकशी केली असताना त्यान चोरीच्या तीन मोटारसायकली काढून दिल्या. या मोटारसायकली त्याने जळगाव, धरणगाव आणि भडगाव तालुक्यातून चोरल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content