लासुर येथून मोबाईल टँबची चोरी

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील लासुर येथे शासकीय कामासाठी दिलेला टॅब अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, संगिता गोपीचंद भादले (वय-३२) रा. लासुर ता. चोपडा हे शासकीय नोकरीला आहे. शासनाकडून ऑनलाईन काम करण्यास १६ हजार रूपये किंमतीचा टँब देण्यात आला आहे. दरम्यान १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास घराच्या जिन्याच्या ओट्यावरून अज्ञात चोरट्याने टॅब चोरून नेल्याचे उघडकीला आला. गावात शोधाशोध आणि विचारपूस करूनही टॅब मिळाला नसल्यामुळे त्यांनी पोलीसात धाव घेतली. संगिता भादले यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Protected Content