इनरव्हील क्लबतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

7fa84aba aca3 4e39 ba84 880e6d4ae208

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चोपडा इनरव्हील क्लबतर्फे नुकतेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच क्लबच्या सदस्यांनी या विद्यार्थ्यांना खाऊ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.

 

याप्रसंगी मंचावर क्लबच्या प्रेसिडेंट डॉ.कांचन टिल्लू, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सौ.अश्विनी गुजराथी, सदस्या सौ.सीमा पाटील, नीतू अग्रवाल, किरण पालीवाल, उज्ज्वला जैन या उपस्थित होत्या. याप्रसंगी केंद्रप्रमुख सौ.मीनाक्षी गाजरे, शिक्षिका सौ.भारती हिरे, सौ.प्रतिभा ठाकरे, सौ.ज्योती भावसार, सौ.प्रतिभा पाटील, सौ.आशालता महाजन, सौ. पांडव या उपस्थित होत्या.

‘रंगीला सावन’ उपक्रम :- इनरव्हील क्लब ऑफ चोपडातर्फे ‘रंगिला सावन’ या धमाकेदार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्याच्या प्रसन्न वातावरणात १० ऑगस्ट रोजी महिलांसाठी ‘एकल नृत्य’, ‘समूह नृत्य’, ‘फॅशन शो’ या विविध कलादर्पणपर स्पर्धांचे मुली व महिलांसाठी आयोजन करण्यात आले आहे. १० ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजता न.पा. नाट्यगृहात होणाऱ्या या स्पर्धांमध्ये सहभागासाठी व माहितीसाठी सौ.अश्विनी गुजराथी, डॉ.कांचन टिल्लू, सौ.चेतना बडगुजर, सौ.चंचल जैस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content