मेसच्या डब्यात पाल आढळल्याने विद्यार्थ्यांना उलट्या

jalgaon district hospital transferred

जळगाव प्रतिनिधी । मेसच्या डब्यात पाल आढळून आल्याने सात विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्या झाल्याचा प्रकार दुपारी घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सातही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय वैद्याकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, एमपीएससी आणि युपीएससी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी आलेले अक्षय राजपूत (वय-21), भूषण पाटील (वय-25), दिपक पाटील (वय-21) सचिन देवरे (वय-22), राहुल साबळे (वय-31), सागर पाटील (वय-32) आणि कृष्णा करते (वय-23) हे सर्व जण बाहेरगावातील विद्यार्थी आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असल्याने त्यांनी जेवनासाठी एकाच ठिकाणी मेसचा डबा लावला होता. आज दुपारी जेवन करण्यासाठी सर्वजण एकत्र बसले. त्यातील एकाच्या डब्यात पाल आढळून आल्याने धक्का बसला. थोड्या वेळाने सर्वजण जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल झाले. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.

Protected Content