वरगव्हान गावात विजेच्या धक्क्याने बकरी मृत्युमुखी (व्हीडीओ)

612ace1c 30c7 4e11 9680 c98f4c24126f

धानोरा ता.चोपडा (वार्ताहर) येथून जवळच असलेल्या वरगव्हान गावात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. यावेळी गावाला वीज पुरवठा करणाऱ्या डीपीतून विद्युत प्रवाह चक्क रस्त्यात उतरला. त्याचवेळी एक बकरी तिकडून जात असतांना तिला जोरदार विजेचा धक्का बसला. हा धक्का एवढा तीव्र होता की, बकरी जागीच मृत्युमुखी पडली. दरम्यान, धानोरा सबस्टेशनच्या निष्काळजीपणामुळे गरीब शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

 

वरगव्हान गावात आज सकाळी जोरदार पाऊसांनंतर गावाला वीज पुरवठा करणाऱ्या डीपीतून रस्त्यावर येत होता. सुदैवाने त्यावेळी एकही व्यक्ती तेथून जात नव्हता. परंतू दुर्दैवाने त्याच वेळेस फिरोज महारु तडवी यांची बकरी डीपीजवळून जात असतांना विजेचा जोरदार धक्का बसत तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, शेतकरी फिरोज तडवी यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे. मागील आठवड्यात त्यांनी एक बकरी विकून आपला वैद्यकीय खर्च केला होता. आज रोजी सुद्धा तडवी हे रुग्णालयात अॅडमिट आहे. बकरी विजेच्या धक्क्याने मेलीय. याची माहिती देण्यासाठी तडवी यांनी धानोरा सबस्टेशनला वारंवार फोन केल्यानंतरही कुणीच प्रतिसाद दिला नाही. तरी या घटनेला जबाबदार असणारे अधिकारींवर तत्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, तसेच श्री. तडवी यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

 

Protected Content