जळगावात धावत्या रेल्वेखाली प्रौढाची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील श्रध्दा कॉलनीत राहणाऱ्या प्रौढाने शिवकॉलनी उड्डाण पुलाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, विजय छगन अहिरे (वय-४९) रा. श्रध्दा कॉलनी जळगाव हे बसमहामंडळाच्या कार्यशाळेत मेकॅनिक म्हणून काम करतात. आज दुपारी १२.३० पासून बाहेर जावून येतो असे सांगत दुचाकीने रामानंद नगर जवळी गिरणा टाकीजवळील बियर शॉपीसमोर येवून दुचाकी पार्क केली. दरम्यान, त्याच्या दुचाकीच्या बाजूला दुसरी दुचाकी अनोळखी व्यक्तीने पार्क केली. दोन्ही गाड्या एकाच कंपनीची आणि एकाच कलरची असल्याने अनोळखी व्यक्तीने विजय अहिरे यांची दुचाकीला चावी लावून निघून गेले. आपली दुचाकी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ते दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास विजय अहिरे यांनी शिवकॉलनी जवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. मयताच्या पश्चात पत्नी निता, मुलगा स्वप्निल आणि मुलगी प्रियंका असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मनोज इंद्रेकर आणि विजय भावसार करीत आहे.

Protected Content