असोदा केंद्रशाळेत जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । असोदा येथील जि.प. केंद्रशाळेत येथे आज जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे शालेय परिसरात वृक्ष वृक्षारोपण करण्यात आले.

आज गुरुवार, दि.२८ जुलै रोजी असोदा येथील जि.प. केंद्रशाळेत देवकाई प्रतिष्ठान, जळगावचे अध्यक्ष चित्रकार सुनील दाभाडे, मुख्याध्यापिका सुनिता कोळी, उपक्रमशील शिक्षिका सोनल महाजन यांच्या हस्ते पेरू, आवळा  कण्हेर यांसह विविध रोपांचे रोपण करण्यात आले.

याप्रसंगी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी मार्गदर्शनात, “मानवी प्रजाती निसर्गाचे स्वैरपणे अमाप शोषण करीत आहे. याचे मानवाने आत्मपरीक्षण व आत्मचिंतन करणे काळाची गरज आहे.” असे आवाहन केले.

सुनील दाभाडे म्हणाले की, “निरोगी वातावरण हे स्थिर आणि निरोगी मानवी समाजाचा पाया आहे.” निकिता आणि निलेश जंगले या भावंडांनी वृक्षारोपणाची जबाबदारी सहर्ष स्विकारली. वृक्षारोपणा प्रसंगी हर्षल तायडे, योगिनी सोनवणे, रेखा डाळवाले आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

प्रस्तावना, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अर्चना गरुड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र जगताप, नंदलाल बाविस्कर, सुपडू कोळी, इंदुबाई पाटील, शारदा कोळी यांनी सहकार्य केले.

Protected Content