ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले; पोलीसांनी दिल्या महत्वाच्या सुचना

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागात गुरे, ढोरे चोरीचे प्रमाण वाढले असल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेऊन सूचना सर्व ग्रामसुरक्षा पथक सदस्यांना देण्यात आल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव ग्रामीण भागात गोरे, ढोरे यांचे चोरीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गावातील शेतकरी भयभीत झाले आहे. या अनुषंगाने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील व गावातील ग्रामसुरक्षा पथक सदस्यांची चाळीसगाव पंचायत समिती सभागृहात शनिवारी १४ मे रोजी सकाळी बैठक घेण्यात आली.

यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी म्हटले की ग्रामीण भागात गुरे, ढोरे चोरीचे प्रमाण वाढत असून आपल्या गावातील शेतकऱ्यांनी गुरे, ढोरे हे रस्त्यालगत बांधू नये. तसेच ज्या ठिकाणी गुरे, ढोरे रस्त्यावर लढत बांधलेले आहेत, अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी रात्री स्वतः तेथे हजर राहतील, याची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच गुरे, ढोरे चोरी होणार नाही. याबाबत सर्व ग्रामसुरक्षा पथक सदस्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन यावेळी केले आहे. तसेच सोशल मीडियावर जातीय व धार्मिक भावना दुखावली जाणार नाही, तसेच आक्षेपार्ह मजकूर आपल्या गावातील व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित होणार नाही, याची देखील दक्षता घ्यावी, अशा सूचना पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिले आहेत. यावेळी ३५० ग्राम सुरक्षा रक्षकांना ओळखपत्र वाटप केले.

Protected Content