सोशल अकाऊंट वापरतांना काळजी घ्या – तुषार परेदशी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सोशल अकाऊंट्स वापरतांना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायला हवी, नियमितपणे आपले पासवर्ड बदलायला हवे, याबाबत नियमावलीचेही मार्गदर्शन तुषार परदेशी (संस्थापक मेकरॉकर टेक्नोलॉजी इन्स्टिटयुट) यांनी केले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सायबर सिक्युरीटी व सेप्टी अवेअरनेस या विषयावर १३ मे २०२२ रोजी सेमीनार आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून उपस्थीत असलेले तुषार परदेशी (संस्थापक मेकरॉकर टेक्नोलॉजी इन्स्टिटयुट) हे मार्गदर्शन करत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार, अधिष्ठाता प्रा.हेमंत इंगळे, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफीसर डॉ.विजयकुमार वानखेडे, सर्व विभाग प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार यांनी तुषार परदेशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी सायबर सुरक्षेची जाण कशी गरजेची आहे यावर विवेचन केले.

त्यात त्यांनी सुरुवातीला वेगवेगळया व्हायरस बदल माहिती देतांना ते किती धोकादायक ठरतात हे सांगितले. हॅकर बद्दल सांगतांना त्यांनी ब्लॅक हॅट, ग्रे हॅट व व्हाईट हंट यांची सविस्तर माहिती दिली. अधिकतर प्रमाणात नागरिकांच्या बेसावध पणामुळे या तक्रारी ओढवल्याचे आढळुन येते. त्यामुळे सर्व व्यवहार सावधगिरीने करायला हवे. हे सर्व त्यांनी उत्कृष्ट उदाहरणे देऊन स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. त्यानंतर तुषार परदेशी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.किशोर महाजन व प्रा.कैलास माखिजा यांनी डॉ.विजयकुमार वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोशनी पाटील (तृतीय यंत्र) या विद्यार्थीनीने केले.

सायबर क्राईम रोखण्यासाठी सेमिनारात मार्गदर्शन काळाप्रमाणे तंत्र बदलते किंवा विकसित होते, याकडे चांगल्या संदर्भाने जसे पाहता येते, तसे वाईट किंवा चुकीच्या बाबीबद्दलही गांभीर्याने बघणे क्रमप्राप्त होते. चोरी लुटमारीचे वा फसवणुकीचे तंत्र असेच बदलले आहे. घरात अथवा दुकानात शिरुन किंवा खिशात हात घालुन चीजवस्तु,पैसा लांबवण्याचा काळ आता राहिला नाही. त्यामुळे या वाढत्या सायबर क्राईम कडे गांभीर्याने लक्ष पुरवुन आधुनिक पद्धतीने व्यवहार करु पाहणा-या ग्राहकांना सुरक्षितता प्रदान करणे हे संबधित सर्वच यंत्रणांसाठी कसोटीचे ठरले आहे. या अनुषंगाने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!