पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार आज पहाटे समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १३ मे रेाजी रात्री ९ वाजता गल्लीतील मैत्रीणीसोबत बोलत होती. त्यानंतर मात्र अल्पवयीन मुलगी गायब झाली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला. गावातील २० ते २५ जणांनी दुचाकी काढून गावातील आजूबाजूच्या शेतात शोधमोहिम राबविली. गावातील वातावरण शांत झाल्यानंतर अज्ञात ५ ते ६ जणांनी १४ वर्षीय मुलीला उचलून नेत तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार केला आणि पिडीत मुलीला पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर गावातील महिलांच्या शौचालयाजवळ सोडून दिले. अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीला आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीला पाचोरा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत अद्याप पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. शेवटचे वृत्त हाती आले पिडीत मुलीचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान संशयित आरोपी हे गावातीलच असल्याची दाट शक्यता असून त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.