अंत्ययात्रेत मानवंदनेसाठी फायर; बंदुकीचे लॉक उघडतांना गोळी छातीत घुसून वृद्धाचा मृत्यू

c70ffbcb 8c95 4494 80df 98a43e0210e2

पिंप्री ता.धरणगाव (वार्ताहर) येथील एका सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या वृद्ध वडिलांच्या मृत्यूनंतर अग्नीडाग देण्यापूर्वी मानवंदना म्हणून बंदुकीने हवेत फायरिंग केली. परंतु बंदूक अचानक लॉक झाली. बंदूक आडवी करून तपासात असतांना अचानक एक गोळी शेजारी उभे असलेल्या एका वृद्धाच्या सरळ छातीत घुसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पिंप्री येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर (ह.मु.नाशिक) यांचे वडील श्रावण बारकू मोहकर (वय ८५) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी साधारण साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहचली. यावेळी आपल्या श्रावण मोहकर यांना मानवंदना देण्यासाठी मोहकर यांचा मुलगा दीपक याने आपल्या बंदुकीमधून हवेत फायर केले. दोन फायर व्यवस्थित झाले परंतु तीसऱ्या फायरला बंदूक लॉक झाली. त्यामुळे दीपकने बंदूक आडवी करून तिला बघत असतांनाच अचानक गोळी बाहेर निघाली आणि अंत्ययात्रेत आलेले तुकाराम वना बडगुजर (वय 60, रा. पिंपळगाव हरेश्वर,ता.पाचोरा) यांच्या छातीत घुसली. या दुर्घटनेत तुकराम बडगुजर हे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता,डॉक्टरांनी मयत घोषित केले.

 

 

या घटनेनंतर मयत बडगुजर यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, नातेवाईकांमध्ये याबाबत समजोत्या संदर्भात चर्चा सुरु होती. दरम्यान, फायर करण्यासाठी परवानगी काढली होती का? एअरगन नेमकी कोणी चालावली याबाबत संभ्रम निर्माण होता. कारण कुणी दीपकने गोळी चालवली असे सांगत होते. तर कुणी विठ्ठल मोहकर यांनी फायर केल्याचे म्हणत होते. मयत बडगुजर यांचे दोन्ही मुलं पोलीस खात्यात असल्याचे कळते. यातील एक मुलगा जळगाव शनिपेठ पोलीस स्थानकात कार्यरत आहे. तर ज्याने गोळीबार केला, त्या दीपक मोहकरची सेक्युरिटी एजन्सी असल्याचे कळते.

Add Comment

Protected Content