घराचा ताबा घेण्याचा वाद पोलिसात

Crime 21

जळगाव, प्रतिनिधी | महावीरनगरातील एका घराच्या ताब्यावरुन दोन कुटंुबांमध्ये वर्षभरापासून वाद सुरू आहेत. याच कारणावरून शनिवारी रात्री पुन्हा वादाला तोंड फुटले. त्यानंतर दोन्ही कुटुंबीय शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्याठिकाणीही गोंधळ सुरू होता. या प्रकरणी दोघांनी परस्परविरोधात तक्रारी दिल्यात.

अभिषेक सुधीर जैन (वय ३९) रा.महावीरनगर यांनी दिलेल्या तक्रारीत शनिवारी (११ जानेवारी) सांयकाळी ६ वाजता लताबाई पाटील, मनीलाल पाटील, कलाबाई पाटील व सुमीत पाटील यांच्यासोबत चार अनोळखी लोकांनी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश करुन जैन कुटंुबियांना मारहाण केली. ‘हे घर आमचे आहे, तुम्ही बाहेर निघुन जा’ अशी दमबाजी केली. जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या तक्रारीत लताबाई पाटील (वय ४६) रा.महावीरनगर यांनी तक्रारीत म्हटले की, शनिवार (दि.११) सायंकाळी ६ वाजता अभिषेक जैन, त्याची पत्नी व दोन अनोळखी लोकांनी पाटील यांच्या घरात घुसून बेकायदेशीरपणे ताबा घेतला होता. जैन यांनी खोटे कागदपत्र तयार केल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यापूर्वी २७ मार्च २०१९ रोजी देखील अभिषेक व त्याची पत्नी अमृता हे पाटील यांच्या घरात बेकायदेशीपणे शिरले होते. त्यावेळीदेखील अभिषेक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याला अटक होऊन सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

Protected Content