थोरगव्हाण येथे राजमाता जिजाऊ अन स्वामी विवेकानंद जयंती साजरी

vivekanand jayanti

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील थोरगव्हाण शिरसाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये आज (दि.१२) राजमाता जिजाऊ आणि थोर युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

 

प्रारंभी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य विनोद भालेराव यांच्याहस्ते राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात विदयार्थिनींनी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून या महान नेत्यांना अभिवादन करीत त्यांच्या कार्याविषयी आपले विचार आपापल्या शब्दांत व्यक्त केले.

मुख्याध्यापक महेद्र देवरे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याविषयी जीवनातील प्रेरक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपले शालेय जीवन योग्यप्रकारे विकसित करावे, असे सांगितले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सुरेश चौधरी, विजय चौधरी, पत्रकार गोकुळ तायडे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Protected Content