जीएसटी घोटाळ्यात वरिष्ठ आयआरएस अधिकारी अटकेत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तब्बल ५०० कोटींच्या जीएसटी घोटाळ्यातील कारवाईत वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना सीबीआयने अटक केली आहे.

 

ईडीने काल  रात्री सीमाशुल्क आणि जीएसटी संवर्गाचे अतिरिक्त आयुक्त सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकला. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ईडीची शोध मोहीम चालू होती. सचिन सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. ही कारवाई सुरू असतांनाच सीबीआयने सचिन सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर ५०० कोटींच्या जीएसटी घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

 

सचिन सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. सचिन सावंत सध्या सीमाशुल्क आणि जीएसटी संवर्गाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. ईडीच्या अधिकार्‍यांनी सावंत यांच्या नातेवाईकांच्या घरांचीही झडती घेतली आहे. सचिन सावंत यांनी यापूर्वी ईडी मुंबई झोन २ मध्ये उपसंचालक म्हणून काम केले होते. यांनी काही हिरे कंपन्यांद्वारे बेकायदेशीरपणे ५०० कोटींहून अधिक रक्कम आपल्या खात्यातून वळवली होती. याप्रकरणाची सचिन सावंत यांनी चौकशी केली होती.

Protected Content