शिवसैनिकांना सन्मान मिळाला, तरच प्रचारात सहभाग

shivsena

जळगाव प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत प्रचारात शिवसैनिकांनाही सन्मानाने स्थान मिळाले तरच भाजपा उमेदवाराचा प्रचार करू असा पवित्रा तथा इशारा आयोजित बैठकीत आलेल्या जिल्हाभरातील शिवसैनिकांनी दिला. यावर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही युती व्हावी अशी मागणी लोकसभा निवडणुकीच्या आत घोषीत करावी अशी मागणी भाजपाकडे करणार आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील लेवा भवनात शिवसेनेची जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

अन्याय प्रत्येकावर झाला आहे. हे मान्य आहे. मात्र आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत आपल्या कार्यक्षेत्रात आपण काम केल्याशिवाय होणार नाही. पाचोरा तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय, तसेच इतर कार्यकर्त्यांवर देखील अन्याय झाला. तसेच माझी आई वारली त्यावेळी मी कारागृहात होतो. त्यामुळे आता रडून चालणार नाही, पक्षाच्या आदेशानुसार युतीसोबत काम करायचे आहे. पक्षाचे आदेशानुसार काम करा तरच पक्ष वाढणार नाही. असे प्रतिपदान सहकार राज्य मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

बैठकीत यांची होती उपस्थिती
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, उपसंपर्क प्रमुख हभप जळकेकर महाराज, मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, नगरसेवक विष्णू भंगाळे व जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख आदी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content