ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळणेबाबत शिवसेनेसह युवासेनेचे निवेदन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी आधार कार्डसाठी स्वाक्षरी करण्याच्या अधिकारासह वैद्यकीय अधिकारी मिळावा. अशी मागणी शहरातील शिवसेनेसह युवसेनेने केली असून यासंदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

मागणी मान्य न झाल्यास यावल शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

यासंदर्भात निवेदनात, “यावल शहर आणि परिसरातील नागरिकांना आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी आणि आधार अपडेट करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सही ग्राह्य धरली जाते. या व्यतिरिक्त इतर अधिकाऱ्यांची सही घेतल्यास सदरील प्रकरण रद्दबातल केले जाते आणि पुन्हा अर्जासाठी दंड आकारला जातो. या अडचणीमुळे नागरिकांचे काम होऊ नाही तर उलट ससेहोलपट होत आहे. त्याचप्रमाणे आधार कार्डच्या कामास विलंब होत आहे.

यामुळे यावल ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी सह्यांच्या अधिकारासह मिळावा आणि नागरिकांची अडचण दूर व्हावी. अशी मागणी शहरातील शिवसेनेसह युवसेनेने केली आहे.” यासंदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास यावल शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, युवासेना शहर अधिकारी सागर देवांग आणि उपशहर प्रमुख संतोष धोबी यासह शरद कोळी, पप्पू जोशी, संतोष खडसे, संतोष वाघ, मयुर खडसे, डॉ. विवेक अडकमोल, विजय कुंभार, हुसेन तडवी, आधार खाटीक, सुरेश कुंभार, योगेश चौधरी, सागर बेंद्रे, अमोल बडगुजर, तोसीक पटेल, संतोष बडगुजर, शफिक पटेल, प्रवीण होणारी, कपिल मन्या, रईस पटेल, अमित पटेल, समीर पटेल, पटेल पटेल, खालीद मण्यार, सागर कोळी, पिंटू कुंभार, योगेश चौधरी, संतोष राजोरी आणि सचिन कोळी यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Protected Content