उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने शिवसेनेने दिले निष्ठेचे शपथपत्र

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शहरातील निष्ठावान शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसा निमित्त २०० प्रतिज्ञापत्र देण्यात आले.

याप्रसंगी विविध प्रकारच्या घोषणा देऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छारुपी भेट देण्यात आली. शिवसेनेच्या वतीने यावलच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णाना फळंं वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना उप तालुका प्रमुख शरद कोळी, शिवसेना उप तालुका संघटक पप्पू जोशी, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष धोबी,  शिवसेना  माजी तालुका प्रमुख कडू पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख योगेश चौधरी, शिवसेना आदिवासी सेलचे तालुका प्रमुख हुसेन तडवी, अल्पसंख्यांक तालुका संघटक अजहर खाटीक, शिवसेना युवासेना शहर प्रमुख सागर देवांग, युवासेना तालुका सरचिटणीस सचिन कोळी, युवासेना शहर सरचिटणीस विजय कुंभार, युवासेना उपशहर अधिकारी पिंटू कुंभार, सुरेश कुंभार, डॉ. विवेक अडकमोल, सारंग बेहेडे, मयुर धोबी, शकील पटेल, हमीद पटेल, प्रवीण लोणारी, अमोल बडगुजर, प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ, प्रदीप वानखेडे, तौसीक पटेल, इमायास उद्दीन शेख, कपील मन्यार, रईस पटेल, समीर पटेल, अशपाक पटेल, अज्जु पटेल, खालिदा मन्यार, सागर कोळी यांच्यासह यावल तालुका व शहर शिवसेना, अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Protected Content