Home Cities जामनेर तालुका विधी प्राधिकरणातर्फे कायदा जनजागृती शिबीर

तालुका विधी प्राधिकरणातर्फे कायदा जनजागृती शिबीर

0
108


पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी | पहूर येथे जामनेर तालुका विधी सेवा प्राधिकरण व जामनेर तालुका वकील संघ आणि एस. एस. मणियार लॉ काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कायदा जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर लोकनियुक्त सरपंच निता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.

 

याप्रसंगी ॲड. एस. आर. पाटील, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी कायदा अंतर्गत यांनी महिला विषयी असलेल्या कायद्याची माहिती दिली. तसेच राजधर पांढरे , बाबूराव घोंगडे, रामेश्‍वर पाटील, राजू पाटील सर, शैलेश पाटील, अंगणवाडी सेविका सुषमा चव्हाण यांनी पीडित महिला व त्यांचे अधिकार या विषयी माहिती तर देवेंद्र पारळकर व प्रसन्न फूसे यांनी विधी सेवा प्राधिकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक व पोलिस पाटील, आशा स्वयसेविका, अंगणवाडी शिक्षिका, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी, तसेच ॲड. देवेंद्र जाधव, ॲड. प्रसन्न फासे, अँड राहुल बावीस्कर, अँड कोमल काळे, अँड आशितोष चंदेले, अँड. सचिन पाटील, गणेश चौधरी, संकेत राजपूत, उपसरपंच श्याम सावळे,रामेश्वर पाटील, बाबुराव घोंगडे, शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे, माजी सरपंच शंकर जाधव ,उपसरपंच राजू जाधव,या कार्यक्रमाला उपस्थित होते. एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तेजस्विनी पाटील, कल्पना शिंदे, प्रिया शिंपी, , पूजा सांखला, दिक्षा गायकवाड, शालीनी पाटील आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ॲड. देवेंद्र पारळकर यांनी सूत्रसंचालन चेतन रोकडे तर आभार ॲड. प्रशांत पाटील यांनी मानले.


Protected Content

Play sound