भुसावळातील श्री बालाजी मंदीरातर्फे प्रधानमंत्री कोषाला १ लाख ५१ हजाराचा धनादेश

भुसावळ प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे सद्यस्थितीत देशावर आलेल्या संकटाला तोंड देण्यास सर्व स्तरातून नागरिक हिरीरीने मदत करत आहेत. श्री व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रधानमंत्री कोषासाठी १ लाख ५१ हजारांचा धनादेश तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

या सहकार्यात धार्मिक संस्था ही पुढाकार घेत आहे. श्री बालाजी मंदिर (श्री व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्ट) तर्फे माननीय तहसीलदारांना १ लाख ५१ हजारांचा चेक प्रधानमंत्री कोषाला समर्पित करण्यात आला. संस्था सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असते. प्रसंगी संस्थेच्या वतीने आमदार संजय सावकारे, नगरसेवक निर्मल कोठारी, नगरसेवक बोधराज चौधरी आदी उपस्थित होते. अशी माहिती अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, कोषाध्यक्ष ब्रिजमोहन अग्रवाल, सचिव दीपक काबरा, राजेंद्र चांडक, मिलिंद अग्रवाल, भवरीलाल दरगड, रामवल्लभ झंवर, मधू शर्मा आदींनी कळविले आहे.

Protected Content