एरंडोल येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे अहिल्याबाई होळकर यांची २९७ वी जयंती पंचायत समिती चौकात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, जि.प. सदस्य नाना महाजन, जि प चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, अनिल महाजन, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, जगदीश ठाकुर, रवींद्र लांडगे, कृष्णा धनगर, डॉ. प्रविण वाघ, शालिग्राम गायकवाड, एस एल पारखे, कैलास धनगर, नवल धनगर, सातपुते, राजू धनगर, सुरेश शिरोडे, रवी धनगर, पुंडलिक धनगर, प्रा. मनोज पाटील, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, बबलू पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Protected Content