Home Cities यावल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी आबिद मोमेन यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी आबिद मोमेन यांची निवड

0
48

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यावल शहर उपाध्यक्षपदी अल्पसंख्याक समाजातील युवा कार्यकर्त आबीद मोमेन यांची निवड करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भोंगे राजकारणाला कंटाळून आबिद मोमेन यांनी मागील आठवड्यात पक्षाला सोडचिट्टी दिली देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील व आदी पक्षातील पदाधिकारी व मान्यवरांच्या उस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

 

तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी आबिद मोमेन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यावल शहर उपाध्यक्षपदी निवड केली आहे. आबिद मोमेन यांच्या निवडीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रभैय्या पाटील, अतुल पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, वसंत पाटील, ओबीसी सेलचे निवृत्ती धांडे, तालुका सरचिटणीस अय्युब खान, मोहसीन खान, सईद शेख रशीद, नाना बोदडे, कामराज घारू आदींनी अभिनंदन केले आहे.

 


Protected Content

Play sound