जामनेरात आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपचे घंटानाद आंदोलन

जामनेर प्रतिनिधी । शहरातील भाजीमंडी परिसरात असलेल्या हनुमान मंदीरासमोर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातून  ढोल टाळ व शंखनाद करून रॅली काढून घंटानाद आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना मोठमोठे कार्यक्रम घेतात राज्यातील डान्स बार बियर बार बाजारपेठे मॉल सिनेमा थेटर सर्व चालू आहे त्याच बरोबर दुसऱ्या राज्यात मंदिरे उघडे आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच मंदिरात कोरोना येतो का असा सवाल आमदार गिरीश महाजन यांनी केला, त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी कोणतेही नियम मला घाबरणार नसून तुम्ही पोलिस उभे करा आम्ही आज पासून राज्यातील मंदिरे उघडे करू, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.     

जामनेर शहरातील भाजीमंडी भागात असलेल्या हनुमान मंदिरासमोर आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने घंटानाद आंदोलन केले. यावेळी धामणे शहरातून भाजपातर्फे ढोल टाळ व शंखनाद करून रॅली काढण्यात आली.  यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक नाना बाविस्कर, नाना वाणी, सुहास पाटील, बाबुराव हिरवळे, बंटी वाघ, भाजपा तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश नाईक, सरचिटणीस सुभाष पवार, रामकिसन नाईक, अजय नाईक, पुखराज डांगे यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content