यावल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

यावल प्रतिनिधी । शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील क्रीडा विभागातर्फे नुकताच राष्ट्रीय क्रीडा दिन ऑनलाइन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी वक्ता म्हणून महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे यावल तालुका अध्यक्ष  के.यु .पाटील सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले. सुरुवातीला प्रा. सी. के. पाटील यांनी प्रस्तावनेत क्रीडा दिन साजरा करण्यामागील भूमिका सादर केली. यावेळी प्रमुख वक्ता के. यु . पाटील यांनी आपल्या भाषणात क्रीडा दिनाचे महत्व विषद केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी खेळाचे खूप महत्त्व आहे. उत्कृष्ट खेळाडूंना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. त्यांनी शासनाचे विविध क्रीडा उपक्रम, क्रीडा क्षेत्रातील शासकीय व शैक्षणिक योजना बाबत सविस्तर माहिती देऊन शारीरिक तंदुरुस्तीसाठी तरी विद्यार्थ्यांनी खेळाकडे  वळावे असे आवाहन केले .आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी मेजर ध्यानचंद व 1936 बर्लिन ऑलिम्पिकच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील तर आभार प्रदर्शन प्रा.पी.आर. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य प्रा. ए.पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार , क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रल्हाद पावरा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content