विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या पुर्वसंध्येला मंगळवारी २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता या शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.

राजभवन कार्यालयाकडून आयोजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराला १९ डिसेंबर पासून प्रारंभ झाला. एन.डी.आर.एफ.च्या ५० प्रशिक्षकांनी शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले. महाराष्ट्रातील २० विद्यापीठांमधील १०४८ जण यात सहभागी झाले आहेत. यामध्ये ५७० विद्यार्थी, ४१८ विद्यार्थिनी, ३९ पुरूष संघव्यवस्थापक, २१ महिला व्यवस्थापक यांचा समावेश आहे. बुधवारी २८ डिसेंबर रेाजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात समारोप समारंभ होणार आहे. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी राहतील. यावेळी रा.से.यो.चे प्रादेशिक संचालक डी. कार्तिकेयन, रा.से.यो. राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार, वानंजे, एन.डी.आर.एफ.चे पी.एस. राणा, अनंता बाभूळकर, रा.से.यो. सदिच्छा दूत प्रिया पाटील यांची उपस्थिती असेल.

दरम्यान मंगळवारी या शिबिरातील सहभागी रा.से.यो. स्वयंसेवकांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.त्यानंतर वैयक्तिक मुलाखतीही झाल्या. तसेच रा.से.यो. कार्यक्रम अधिकाऱ्यांची देखील ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. गेल्या ८ दिवसात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात शिकविलेल्या अभ्यासावर अधारीत ही परीक्षा होती. विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्रात परीक्षा झाली. कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी परीक्षा केंद्राला भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुसज्ज ऑनलाईन परीक्षा केंद्र पाहून बाहेरील विद्यापीठातील विद्यार्थ्याानी कुलगुरूंकडे उत्तमसुविधा विद्यापीठात असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, निरीक्षक डॉ. प्रमोद पाब्रेकर, डॉ. रामचंद्र जोशी, डॉ. संजय चाकणे, पी.एस. राणा, अनंता बाभूळकर, प्रा. समीर नारखेडे, दाऊदी हुसेन, डॉ. सचिन नांद्रे, प्रा.के.एफ. पवार, डॉ. मनिष करंजे आदी उपस्थित होते.

Protected Content