जनमत प्रतिष्ठानकडून करियर महोत्सव व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   येथे जनमत प्रतिष्ठानकडून विविध क्षेत्रातील ज्ञानवंत लोकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच करियर महोत्सवअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष होते.

 

सरदार पटेल सभागृहामध्ये जनमत प्रतिष्ठानकडून राज्यस्तरीय कला, शिक्षक, पत्रकारिता, सामाजिक, पर्यावरण या क्षेत्रातील ज्ञानवंत लोकांना पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला.  तसेच आयुष्यावर बोलू काही या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सचिन देवरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच संजय दादा गरुड यांनी शिक्षणाविषयी कशी वाटचाल करावी याबद्दल मुलांना शिक्षणाचे धडे दिले. शहराचे महापौर जयश्री महाजन यांनी शिक्षणाचा पाया पक्का करून स्पर्धा परीक्षेमध्ये कसे यश मिळवायचे ते त्यांनी मत व्यक्त केले.  त्यानंतर करियर महोत्सव स्पर्धेमध्ये विजेत्यांना बक्षीस वितरण देण्यात आले. त्याप्रसंगी डाएट प्राचार्य डॉ. अनिल झोपे, ग. स. सदस्य विजय पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, एस. डी. भिरूड, प्रतीक्षा पाटील, करीम सालार, नगरसेविका निता सोनवणे, आनंद विद्याघर, प्रवीण जाधव, डॉ. रुपेश पाटील उपस्थित होते. दरम्यान, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व सचिव हर्षाली पाटील यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. याश्वितेसाठी  चेतन सोनवणे चेतन सोनार किशोर पाटील व हेमंत बडगुजर , अॅड. हेमंत दाभाडे, सुनील परदेसी, रामानंद वारके यांनी कामकाज पाहिले. सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले.

 

Protected Content