अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामदेववाडी ते शिरसोली रस्त्यावरील फाट्याजवळ भरदाव दुचाकी आदळल्याने दुचाकीवरील एकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली होती. याप्रकरणात चौकशी अंती दुचाकी चालवणारा दुचाकीस्वारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश गोकुळ पाटील रा. मेहरून जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश गोकुळ पाटील रा. मेहरून जळगाव हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुमारास निलेश पाटील हा रामदेव वाडी ते शिरसोली रस्ताच्या दरम्यान दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएस ७९५४) वरील चालक रवींद्र खुरपडे याच्या दुचाकीने येत असताना जोरदार धडक दिली. या अपघातात निलेश पाटील यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या घटनेबाबत चौकशी आणखी अखेर शनिवार ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी चालक रवींद्र खुरपडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे हे करीत आहे.

Protected Content