रायफल शुटींगच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची जिल्हा संघात निवड

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथे होणा-या २५ व्या कॅप्टन एस.जे.ईजेकल मेमोरीयल महाराष्ट्र स्टेट शुटींग चैंपियनशिप (नोव्हाईस) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जळगांव जिल्हा रायफल असोशिएशनच्या जिल्हा संघात २ खेळाडूंची निवड झाली आहे.

मुंबई येथे वरली येथील रेंजवर महाराष्ट्र रायफल असोशिएशनने दि.०३ जून ते ०७ जून दरम्यान २५ व्या कॅप्टन एस. जे. ईजेकल मेमोरीयल महाराष्ट्र स्टेट शुटीग चॅंपियनशिप (नोव्हाईस) स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

या राज्यस्तरीय स्पर्थेत एअर रायफल, एअर पिस्तोलसह सर्व प्रकारचे स्मॉलबोअर रायफल व पिस्तोलच्या स्पध्धा वेगवेगळ्या वयोगठामध्ये होणार असून संपूर्ण राज्यातून नवोदित व जुने राष्ट्रीय खेळाडू एम.क्यु.एस. या प्रकारच्या स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्थेत जळगांव जिल्हा रायफल असोशिएशनच्या खालील खेळाडुची निवड झालेली आहे. संस्थेचे अध्यक्ष विशन मिलवाणी यांनी संघ व्यवस्थापक म्हणून संस्थेचे सचिव दिलीप गवळी तर संघ प्रमुख म्हणून एन.आय.एस. शुटींग कोच कु. प्रियंका पटाईत यांची निवड केली आहे.

 

१० मीटर एआर पिस्तोल –

दिलीप गवळी – असोशिएशनचे मुख्य प्रशिक्षक

रेणुका किरण सपकाळे – ओरीयंट सी. बी.एस. सी. जळगांव

उज्वल ललित गवळी – न्यु इंग्लिश मिडीयम स्कुल, जळगांव

० मीटर फ्रि पिस्तोल –

दिपक भाऊलाल कोळी, जळगांव

१० मीटर एअर रायफल –

मुकेश गोविंद सोनवणे, सेंट टेरेसा कॉन्वेट हायस्कुल, जळगांव

प्रथमेश धनराज पाटील, सेट लॉरेन्स हायस्कुल, जळगांव

खेळाडूंची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विशन मिलवारणी, उपाध्यक्ष, प्रा. यशवंत सैंदाणे, हि.ओ.चौधरी, प्रा.विनोद कोचुरे आदी पदाधिकाऱ्यांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Protected Content