आजपासून रंगणार जळगाव येथे राष्ट्रीय कॅरम स्पर्धा

WhatsApp Image 2020 02 02 at 3.09.06 PM

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व जळगाव डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या यजमानपदाखाली भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत व सारस्वत बँक, स्काय आय एम एफ व हिंदुस्थान पेट्रोलियम  सह पुरस्कृत ४८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेचे उदघाटन आज पाणी पुरवठा तथा पालकमंत्री मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

२५ राज्य व १३ संस्थां अशा संपूर्ण भारतातून जवळपास ५०० खेळाडू व १०० पंच व कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित या स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी महापौर भारती सोनावणे, आमदार राजूमामा भोळे, माजी, आंतर राष्ट्रीय कॅरम महासंघाचे सचिव व्ही. डी. नारायण, अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या सचिव भारती नारायण उपस्थित होते. तसेच  जैन इरिगेशनचे दलूभाऊ जैन, प्रायोजक भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जळगाव शाखेचे प्रमुख चंद्रशेखर आगरकर व बबन पवार, जळगावचे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, राज्य कॅरम असोसिएशनचे अरुण केदार, उपाध्यक्ष शांताराम गोसावी, उपाध्यक्ष, धनंजय साठे, मानद सचिव यतिन ठाकूर, जळगाव जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष राधेशाम कोगटा, सचिव नितीन बरडे आदी उपस्थित होते. सांघिक महिला व पुरुष गटाने स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे इक्विपमेंट पार्टनर असलेल्या सिस्का कंपनीचे एकंदर ४८ फायटर कॅरम बोर्ड व लिजण्ड स्पेशल एडिशन कॅरम सोंगट्या वापरण्यात आल्या आहेत. याप्रसंगी उदघाटक गुलाबराव पाटील यांनी एवढी मोठी स्पर्धा जळगांव येथे आयोजित होत असल्याबद्धल आनंद व्यक्त केला. तर माननीय महापौर भारती सोनावणे यांनी या स्पर्धेतील सार्वांचे जळगाव येथे आल्याबद्धल स्वागत केले. अतुल जैन यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तर आंतर राष्ट्रीय कॅरम महासंघाचे महासचिव व्ही. डी. नारायण व अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या सचिव भारती नारायण यांनी खेळाडूंना आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून जळगावकराना खुश करण्यास सांगितले. अरुण केदार यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.

Protected Content