तरूणीच्या हातातील मोबाईल लांबविला

जळगाव – लाईव ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |शहरातील ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जवळ विद्यार्थिनीच्या हातातून १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात दोन जणांनी जबरी हिसकावून लंपास केल्याची घटना मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंद नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षदा मुकेश कुलकर्णी (वय-१९) रा. एसएमआयटी कॉलेज, जळगाव ही विद्यार्थीनी मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहरातील एम.जे. कॉलेज परिसरातील ओरीयन इंग्लिश मीडियम स्कूलजवळ तिच्या मैत्रिणी सोबत गप्पा मारत होती. अज्ञात दोन जण अचानक विद्यार्थीनीजवळ आले. त्यांनी तिच्या हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून लंपास केला. तरूणीने आरडाओरड केली, तोपर्यंत दोघे पसार झाले होते. विद्यार्थीनीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून दुपारी ४ वाजता अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.

 

Protected Content