जिल्हा रूग्णालयात रूग्णाचा बाथरूममध्ये कोसळून मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाथरूममध्ये एक रूग्णाचा पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्याने रूग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या कोविड कक्षामध्ये एक महिला ही बाथरूममध्ये मृत्यूमुखी पडल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून हे प्रकरण शांत होत नाही तोच शनिवारी पंडित अहिरे (वय ४८, सावखेडा, ता. अमळनेर) या रूग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला आहे. हा रूग्ण कोरोना बाधीत नसून त्याला मधुमेहाचा आजार होता. यातच काही दिवसांपासून त्याला न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने आठ दिवसांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा बाथमरूमध्ये पडून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे या आपल्या सहकार्‍यांसह शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी अधिष्ठात्यांची भेट घेऊन या प्रकरणी चौकशीची मागणी केली. दरम्यान, उपचार घेणार्‍या गंभीर रुग्णांना बेडवर जेवणाची व्यवस्था करावी. बेडपॅन, कॅथेडरची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

Protected Content