जया प्रदांवर वादग्रस्त वक्तव्य; सपा नेते आजम खान यांच्याविरुद्ध गुन्हा

jaya prada azam khan

 

रामपूर (वृत्तसंस्था) भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल प्रचारा दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे नेता आजम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जर मी कोणाचा अपमान केला आहे हे जर सिद्ध झाले तर निवडणुकीतून माघार घेईन असे आजम खान यांनी सांगितले आहे.

 

रामपूरच्या शाहाबादमध्ये निवडणूक प्रचार सभेत आजम खान यांनी नाव न घेता भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्यावर निशाणा साधला. ‘ज्यांना हात पकडून आम्ही रामपूरमध्ये आणले, त्यांच्याकडून 10 वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांचा खरा चेहरा समजण्यासाठी 17 वर्षे लागली. 17 दिवसांमध्ये कळाले की यांची अंतरवस्त्रे खाकी रंगाची आहे’, असे आजम खान म्हणाले. या प्रचार सभेत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव देखील उपस्थित होते. हे विधान भाजपाने गांभीर्याने घेतले असून माफीची मागणी केली आहे. दरम्यान, रामपूरच्या शाहाबाद पोलीस ठाण्यात यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शाहाबाद मेजिस्ट्रेट महेश कुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content