संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकर संपणार ?

 

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या संकटामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता वर्तवण्यात येत  आहे. 30 खासदारांना कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

14 सप्टेंबर रोजी सहा महिन्यांत पहिल्यांदाच संसद अधिवेशनाला सुरुवात झाली आणि 1 ऑक्टोबरपर्यंत काम करायचे होते, पण संसदेच्या कामकाजाचा कालावधी एक आठवड्यानं कमी केला जाऊ शकतो.

अधिवेशन सुरू झाल्यापासून कोरोना पॉझिटिव्ह खासदारांची संख्या वाढली आहे, त्यामुळे सरकार अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा विचार करीत आहे. शनिवारपासून अधिवेशनासाठी संसदेत प्रवेश करणा-या पत्रकारांना सरकारने डेली अँटीजन टेस्टदेखील अनिवार्य केली आहे.

खासदारांना कोरोना विषाणूची लागण होण्याच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर नवीन प्रोटोकॉलनुसार संसद आवारात प्रवेश करणारे सर्व कर्मचारी आणि पत्रकारांसाठी दररोज अँटीजन तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. एका ज्येष्ठ संसद सदस्यानं सांगितले की, दोन्ही सभागृहाचे सदस्य विशिष्ट अंतरानंतर आरटी-पीसीआर तपासणी करीत आहेत. खासदार आरटी-पीसीआर तपासणी खासदार कितीही वेळा करू शकतात.

Protected Content