ब्रेकींग : ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा होणार सुरू !

मुंबई प्रतिनिधी | कोविडच्या नियमांचे पालन करून ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज या निर्णयाला मान्यता दिली आहे.

कोरोना आटोक्यात आल्याने शाळा केव्हा सुरू होणार याबाबत अद्यापही संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्‍वभूमिवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता, ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावानुसार कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यात येणार आहे.  बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण  झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

Protected Content