अमडापुर येथे अखिल गुरव समाज संघटनेची सभा

खामगाव प्रतिनिधी । अखिल गुरव समाज संघटना बुलढाणा जिल्हा स्तरीय बैठक अमडापूर येथील बल्लाळ देवी संस्थान मध्ये पार पडली.

या बैठकीत दिनांक १८ मार्च २०२० ला आझाद मैदान मुंबई येथे गुरव समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी आंदोलन राज्य स्तरीय संघटनेने आयोजित केले असून याबाबत चर्चा करण्यात आली या बैठकी मध्ये मुंबई येथील आंदोलनात बुलढाण्या जिल्ह्यातील समाज बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी गुरव समाज जिल्हाध्यक्ष गोपाळ सोनटक्के, विदर्भ प्रमुख किरण महाराज पुजारी (मुंदेफळ) , जयंत वानखडे (खामगांव), जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय वाघमारे (मेहकर), मेहकर तालुका अध्यक्ष संजय विटकरे, जिल्हा युवा अध्यक्ष मंगेश वाघ सचिन वाघमारे, संतोष इंगळे,किशोर महाराज, भागवत सोनटक्के, गजानन आळेकर (खामगांव), आदी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी गुरव समाज जिल्हाध्यक्ष गोपाळ सोनटक्के यांनी मुंबई येथील आंदोलना मध्ये समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थीत राहावे असे आहवान केले आहे. अधिक माहिती करीता गोपाळ सोनटक्के – ९७६३०८२७४२ , किरण महाराज – ९०११३००३०१, वाघमारे -९८५०५७३८९२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content