आई वडिलांच्या भांडणात डोक्यात लोखंडी रॉड लागून मुलीचा मृत्यू !

हिंगोली (वृत्तसंस्था) आई वडिलांच्या भांडणात डोक्यात लोखंडी रॉड लागून मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सेनगाव तालुक्यातील सवना येथे घडली आहे.

विनोद देविदास भालेराव याचा त्याची पत्नी रत्नमाला विनोद भालेराव यांच्यासोबत मंगळवारी कुठल्या तरी कारणावरून रात्री वाद झाला. थोड्याच वेळात दोघांमधील वाद विकोपाला गेला. यामध्ये विनोद याने रागाच्या भरात लोखंडी रॉडने रत्नमाला यांच्या डोक्यात वार केला. त्यामध्ये त्यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली. तेवढ्यात त्यांची मुलगी वैष्णवी (वय १०) ही आई-वडिलांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न करायला लागली. परंतू संतापाच्या भरात विनोदने वैष्णवीच्या डोक्यात रॉड मारला. यात वैष्णवी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.

Protected Content