भाजपने नीतेश राणे यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भाजपचे आमदार नीतेश राणे यांना भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. या यादीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, विधान परिषदेतील नेते प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, राणे यांचे नाव वगळल्याने भाजपचे नेते, पदाधिकारी आणि विशेषतः संघ परिवारात आश्चर्य व्यक्त होत आहे.

नीतेश राणे यांनी गेल्या दोन वर्षांत हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली आवाज उठविला. नगर जिल्ह्यातील ख्रिश्चन धर्मांतरण, काही विशिष्ट ठिकाणी मुस्लिम धर्मियांकडून निर्माण केली जाणारी धार्मिक तेढ अशा असंख्य प्रकरणांत नीतेश राणे यांनी पुढाकार घेत ही प्रकरणे वेळोवेळी थेट विधीमंडळातील पटलावर आणली. त्यानंतर चौकशी होऊन अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झालेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. मुंबईतील अनधिकृत बांग्लादेशींच्या वास्तव्याकडे त्यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले.

तीन मजली इमारतीसाठी परवानगी असताना चौदा मजली इमारत उभारली गेली. त्यात बांग्लादेशींचे वास्तव्य होते. हा विषय समाजासमोर आणून तिथे प्रशासनाला कारवाईस भाग पाडले.भाजपचा सर्वांत महत्त्वाचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे. ही भूमिका पुढे नेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज्यात पाचारण करण्यात आलेले आहे. मात्र राज्यात गेल्या दोन वर्षांपासून हिंदुंना रस्त्यावर उतरण्यासाठी प्रेरीत करणाऱ्या नीतेश राणे यांना मात्र डावलण्यात आले आहे. राज्यातील लोकसभेच्या प्रचारापासून त्यांना लांब ठेवण्यात आल्याने भाजपा आणि संघ परिवारातच आश्चर्य व्यक्त होत आहे.

Protected Content